त्वचेवरील नायटा घालवण्यासाठी घरगुती हमखास उपाय

 त्वचेवरील नायटा घालवण्यासाठी घरगुती हमखास उपाय

एकमेकांचे कपडे वापरल्याने, दमट वातावरणामुळे, त्वचा कोरडी पडल्याने, ओले अंडरवेअर वापरल्याने पोषक आहाराच्या अभावामुळे आपल्या शरीरावर नायटा येऊ शकतो. शरीरावर नायटा येण्याआधी अंगाला खाज येते नंतर त्याजागी लालसर चट्टा पडतो त्यालाच नायटा म्हणतात.


मांड्याना, हाताना, मानेवर नायटा आल्यास तो घालवण्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. नायटा हा संसर्गजन्य आजार आहे त्यामुळे एकमेकांचे टॉवेल, कपडे वापरल्याने हा आजार होण्याचा धोका असतो.


नायटा घालवण्यासाठी एका वाटीत लसणाच्या 3-5 पाकळ्यांचा रस घ्या त्यामध्ये थोडे मोहरीचे तेल मिसळा त्यानंतर हे मिश्रण लावण्यासाठी कापूस घ्या. कापसाचा बोळा ह्या मिश्रणात बुडवून नायट्याच्या जागेवर लावा. हा उपाय नियमित केल्याने नायटा बरा होऊन आपल्याला आराम मिळेल.


कडूलिंबाची साल सुकवून ती जाळून राहिलेल्या राखेत नारळाचे तेल मिसळून नायट्यावर लावा. हा उपाय आठ दिवस नियमित केल्याने येणारी खाज थांबून आराम मिळतो. तसेच नायटा नाहीसा होतो. कडुलिंबाच्या पानाची पेस्ट करून ती अंगाला खाज येणाऱ्या भागावर लावल्याने अंगाला येणारी खाज थांबते.


नायटा घालवण्यासाठी आपण कोरफड गराचा वापर करू शकता. कोरफड गरामध्ये एन्टी-फंगल आणि एन्टी -बॅक्टेरियल गुणधर्म असतात. नायटा आलेल्या जागेवर कोरफड गर लावल्याने येणारी खाज थांबते. आणि काही दिवस नियमित लावल्याने नायटा देखील जातो.



Home remedies to get rid of skin blemishes


 Sharing clothes, humid environment, dry skin, wearing wet underwear can cause our body to lose nutrients due to lack of nutrition.  Before naita occurs on the body, the body is itchy, then a red rash appears in its place, that is called naita.



 Today we are going to learn about some home remedies that can be done to get rid of warts on legs, arms, and neck.  Naita is a contagious disease so there is a risk of getting this disease by using each other's towels, clothes.



 To get rid of naita, take the juice of 3-5 cloves of garlic in a bowl, mix it with some mustard oil, then take a cotton ball to apply this mixture.  Dip a cotton ball in this mixture and apply it on the affected area.  By doing this remedy regularly, you will get relief from Naita.



 Dry neem peel and mix coconut oil with burnt ashes and apply it on the naitya.  By doing this remedy regularly for eight days, the itchiness stops and gets relief.  Also Naita disappears.  Applying a paste of neem leaves on the itchy parts of the body stops the itching.



 You can use aloe vera gel to get rid of naita.  Aloe vera has anti-fungal and anti-bacterial properties.  Applying aloe vera gel on the affected area stops the itching.  And with regular application for a few days, Naita also goes away.